दिल्लीत शरद पवारांशी चर्चा; मविआचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार

पुणे जिह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदकारांनी ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या पुणे जिह्यातील उमेदवारांनी मंगळवारी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत पुण्यातील उमेदवारांनी ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस प्रशांत जगताप, दत्ता बहिरट, रमेश बागवे, अश्विनी कदम, संजय जगताप, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. ईव्हीएमबाबत सर्वांनीच संशय व्यक्त केला. त्यासंबंधीची आकडेवारीही त्यांनी सादर केली. पवार यांनी त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच केजरीवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवर चर्चा केली.