अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक 

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात एपूण 29 गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले होते.

पीडित मुलगी ही गोरेगाव पूर्व परिसरात राहते. ती दुकानातून दूध आणून घरी परतत होती. तेव्हा अटक आरोपीने तिला रस्त्यात पकडले. त्याने तिच्यासोबत नकोसे पृत्य केले. सुदैवाने मुलीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. त्यानंतर घरी गेली. घडल्या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. ती माहिती ऐपून मुलीच्या आईला धक्काच बसला. मुलीच्या आईने दिंडोशी पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या पथकातील उपनिरीक्षक नितीन सवणे, वायंगणकर, कांबळे, शिंदे, भंडारे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी मालाड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. अटक आरोपीने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला गुन्हा केला होता. तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. त्याच्या विरोधात एपूण 29 गुन्हे दाखल आहेत. त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड पाहून त्याला पोलिसांनी एक वर्षासाठी हद्दपारदेखील केले होते.