महापालिका मुख्यालयाजवळील अमर जवान स्मारकाची दैना

फोटो - संदीप पागडे

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अमर जवान स्मृतिस्तंभाची सद्यस्थितीत अत्यंत दैना झाली असून स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी आयतापृती बनविण्यात आलेल्या कारंज्यांचे आता डबक्यामध्ये रूपांतर झाले आहे. या डबक्यात हिरवेगार पाणी जमा झाले असून मोठय़ा प्रमाणात शेवाळही तरंगत आहे. विशेष म्हणजे पालिकेची यंत्रणा घरोघरी, कार्यालयात जाऊन साठलेल्या पाण्यात डेंग्यू, मलेरिया शोधण्याचा दावा करीत असताना मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱया या स्मृतिस्तंभ परिसराच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. स्मृतिस्थळाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीच्या विटाही कोसळल्या असून पृत्रिम दिवाही गायब झाला आहे.