एकीकडे उष्णतेच्या लाटेच्या सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीला दुसरीकडे पाणीकपातीलाही तोंड द्यावे लागत आहेत. दिल्लीतील पाणीकपातीने नागरिकांची झोप उडलेली असताना आता नवी दिल्लीतील सर्वाधिक सुरक्षित आणि व्हीव्हीआयपी भाग समजल्या जाणाऱ्या लुटियन विभागातही पाणीकपात करण्यात येत आहे. या लुटियन विभागात राष्ट्रपती भवन, संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान, आरएमएल हॉस्पिटलसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची, मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. यामुळे या पाणीकपातीची झळ सर्व महत्त्वाच्या व्हीव्हीआयपींना आणि निवासस्थानांना बसली आहे.
लुटियन विभागातील पाणीकपातीवर NDMC चे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लुटियन विभागात पंतप्रधानांचे निवासस्थान, राष्ट्रपती भवन, संसद, आरएमएल हॉस्पिटलसह अनेक ठिकाणं येतात, असे सतीश उपाध्याय म्हणाले. आमच्या समोर एक मोठे आव्हान आहे. दिल्ली जल बोर्डाने आमच्या भागात पाणीकपात केली आहे. आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. NDMC ला 125 MLD पाण्याची गरज आहे. पण सध्या फक्त 70 ते 80 MLD एवढ्याच पाण्याचा पुरवठा दिल्ली जल बोर्डाकडून करण्यात येत आहे, असे सतीश उपाध्याय यांनी सांगितले.
दिल्लीतील पाणीकपातीवरून दिल्ली सरकारमधील सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टी आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप शासित राज्य हरयाणाकडून पाणी दिले जात नाहीये. हिमाचल प्रदेशातून पाणी सोडण्यात येत आहे. पण हरयाणा ते संपूर्ण पाणी दिल्लीला सोडत नाहीये, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
पाणीकपातीवरून दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. या संकटावर तातडीने ताोडगा न काढल्यास 21 जूनपासून अनिश्चितकालीत उपोषणाला बसेल, असा इशारा आतिशी यांनी दिला आहे. हरयाणाने दिल्लीसाठी 613 एमजीडी ऐवजी 513 एमजीडी सोडले. एक एमजीडी पाणी हे 28,5000 याचा अर्थ 28 लाखाहून अधिक नागरिकांसाठी पाणी सोडण्यात आले नाही, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.