मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरण सुरु असतानाच आता कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत केजरीवालांना न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश देत मोठा झटका दिला. आता कथित मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआय केजरीवाल यांना अटक करण्याची शक्यता आहे.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी गेले दोन दिवस सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली. चौकशीनंतर केजरीवाल यांच्या अटकेची तयारी सीबीआयने सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल आधीच न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयासमोरच त्यांच्या अटकेची औपचारिकता होऊ शकते. केजरीवाल यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यासाठी सीबीआयने प्रोडक्शन वॉरंट मागितला होता. त्यानुसार सकाळी 10 वाजता केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयातच सीबीआय त्यांना अटक करेल, अशी शक्यता आहे.
केंद्र की भाजपा सरकार ने सीबीआई के साथ मिलकर रची बड़ी साज़िश! pic.twitter.com/C6OLNLA6bQ
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 25, 2024
आपचे खासदार संजय सिंह यांचे केंद्र सरकारवर ताशेरे
अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकार जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांच्याविरोधात कटकारस्थान करत असल्याचा आरोप आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. तसेच सीबीआयनेही केजरीवाल यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचे सिंह म्हणाले. केंद्र सरकारकडून होणारा अन्याय आणि अत्याचार जनता पाहत आहे. भाजपकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात जनता अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे आणि एकत्र येऊन केंद्र सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध लढेल, असेही सिंह यांनी पुढे नमूद केले. आपल्या एक्स अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत सिंह यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.