दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळालं तिकीट? जाणून घ्या

आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच यादीतील तीन विद्यमान आमदारांची तिकिटे पक्षाने कापली आहेत.

गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या जागांवर आपने आपले पहिले उमेदवारही जाहीर केले आहेत. पक्षाने ज्या आमदारांची तिकिटे कापली आहेत, त्यात किरारीमधून रुतुराज झा, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि मतियालामधून गुलाबसिंग यादव यांचा समावेश आहे.

नुकतेच भाजप सोडून आपमध्ये प्रवेश केलेल्या ब्रह्मसिंह तंवर यांना पक्षाने छतरपूरमधून तिकीट दिले आहे. बदरपूरमधून राम सिंह यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सीलमपूरमध्येही पक्षाने विद्यमान आमदाराचे तिकीट रद्द करून झुबेर चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

कोणाला कुठून मिळाली संधी?

छतरपूर – ब्रह्म सिंग

किरारी- अनिल झा

विश्वास नगर- दीपक सिंघला

रोहतास नगर- सरिता सिंग

लक्ष्मी नगर- बीबी त्यागी

बदरपूर- राम सिंह

सीलमपूर- जुबेर चौधरी

सीमापुरी- वीर सिंग धींगान

घोंडा- गौरव शर्मा

करावल नगर- मनोज त्यागी

मतियाळा- सोमेश शौकीन