दिवाळीपूर्वीच राजधानीची हवा बिघडली; उत्तर हिंदुस्थानात प्रदूषणाच मोठी वाढ

दरवर्षी दिवाळीदरम्यान दिल्ली,पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात तण जाळल्यामुळे प्रदुषणाची समस्या उद्भवते. मात्र यंदा दिवाळीपूर्वीच बिहार आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे. दिवाळीला काही दिवस बाकी असताना राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यात प्रदुषणाची समस्या  वाढत आहे. यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यात जळजळ होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दिवाळीपूर्वीच बिहारमधील प्रदूषण वेगाने वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे येथील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. त्याचबरोबर बिहारची जीवनवाहिनी असलेल्या गंगा आणि यमुना नद्या प्रदूषित होऊ लागली आहे. शहरी कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे गंगा नदी प्रदूषित होत आहे. यासोबतच भूमी प्रदूषणाचाही शेतीवर विपरीत परिणाम होत असून त्याचा परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर होत आहे. प्रदूषणाच्या या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

दिवाळीपूर्वी पटनामधील अनेक भागात AQI हा चिंतेचा विषय बनला आहे. पटनाचा AQI 236, हाजीपूर 249 आणि कटिहार 228 वर नोंदवला गेला आहे. आसनसोलचा AQI 229, बिहार शरीफ- 158, बक्सर- 141, बेगुसराय- 218, गया- 143, हाजीपूर- 249, मुजफ्फरपूर- 127, मुंगेरमध्ये 225 AQI नोंदवला गेला आहे. तर अनेक शहरांतील हवेची गुणवत्ताही चांगली आहे. ज्यामध्ये मोतिहारी-63, पूर्णियाचा 60, सासाराम- 57, सिवान-138, सहरसा-116 AQI नोंदवण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच 24 ते 26 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील.