दापोलीत शिंदे गटाला हादरा; शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

ठाकरेंशिवाय शिवसेना होऊच शकत नाही आणि त्यामुळे शिंदे गटात भ्रमनिरास झालेल्या शिरखल दगडवणेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात घरवापसी केली. ही घरवापसी शिंदे गटाला चांगलीच हादरा देणारी ठरली आहे

दापोली तालुक्यातील शिरखल दगडवणे वाडीतील शिंदे गटात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच शिंदे गटात भ्रमनिरास झाला त्यामुळे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे दापोली विधानसभा मतदार संघातील सारी राजकीय गणिते बदलणार आहेत.

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार असेल वा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली शिवसेना असेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना विचाराची भगवी पताका पुढे नेण्याचे महत्वाचे काम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करीत आहे तोच विचार पकडून माजी आम. संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघात मार्गक्रम करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारच महाराष्ट्रसह देशाला तारणार असल्याची लोकभावना स्पष्टपणे जाणवत असून आपणही या मुळ शिवसेनेच्या प्रवाहात सामिल होणे हिताचे आहे या उद्दात भावनेने दापोली तालूक्यातील शिरखल दगडवणेवाडीतील मनोहर बाबुराव शिर्के, आशा बाबुराव शिर्के, चंद्रभागा एकनाथ शिर्के, अविरा बाजीराव शिर्के, अनिता सिताराम येरुणकर, सुमित्रा सदाशिव शिर्के, तारामती रंगराव शिर्के, वनिता अशोक शिर्के, अनिता आत्माराम शिर्के, लक्ष्मी शांताराम शिर्के, सावित्री शिर्के, सुंनदा मुकुंद शिर्के, माधवी बाळाराम शिर्के, एकनाथ कृष्णा शिर्के, आत्माराम सिताराम शिर्के, कृष्णा यशवंत शिर्के, दिपक केशव शिर्के, केशव शिर्के, सुशिल सीताराम येरुणकर, मनोहर अशोक शिर्के, आर्यन अनिल राणे, आयुष अनिल राणे, शांताराम वामन शिर्के, मुकुंद शिर्के, बाळाराम सुंदर शिर्के, विशाल एकनाथ शिर्के आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात माजी आम. संजय कदम यांच्या उपस्थित आणि नेतृत्वाखाली यापुढे काम करण्यासाठी जाहीर प्रवेश केला.

यावेळी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, साई मोरे, पालगड विभाग प्रमुख विलास कलमकर, चिंचाळी शाखाप्रमुख सुनिल दळवी, कालेकर, उपशाखा प्रमुख रामचंद्र गौरत, जेष्ठ शिवसैनिक बाळकृष्ण मोरे, विभागातील सर्व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख,महिला तसेच शिवसैनिक, युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.