Dapoli News – दापोली दाभोळ मार्गावर नानटे गावाच्या हद्दीत मालवाहू वाहन खोल दरीत कोसळले

दापोलीहून दाभोळ या गावाकडे किराणा सामान घेऊन निघालेल्या एका मालवाहू वाहनाचा नानटे येथे खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी आल्यावर पंचनामा केल्यानंतरच नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.

दापोली तालुक्यातील दापोली जालगाव उंबर्ले मळे मार्गे दाभोळकडे जाणाऱ्या मार्गावरील नानटे गावाच्या हद्दीत रस्त्यालाच लागुन असलेल्या एका खोल दरीत हे अवजड वाहन कोसळले. रस्त्याला संरक्षक कठडा नसल्याने हे वाहन थेट दरीत कोसळले. या झाल्या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी वाहन चालकाला चांगलीच दुखापत झाली आहे तसेच वाहनामधील किराणा मालाचे ही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटना स्थळी आल्यावर पंचनामा केल्यानंतरच ख-या नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.

दापोली दाभोळ मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने अशा अपघाताच्या घटना घडत असतात त्या घडू नयेत म्हणून पुन्हा एकदा संरक्षण कठडयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक तेथे संरक्षक कठडे उभारणीचे काम हाती घ्यायला हवे अशाप्रकारची मागणी नानटे ग्राम पंचायतीची माजी सरपंच संजय पाते यांनी या निमित्ताने परत एकदा उचलून धरली आहे.