Dapoli constituency – संजय कदम यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचाराचा झंझावात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या संजय कदम यांनी निवडणूक प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दापोली शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. कार्यकर्त्यांचा झंझावाताने विरोधक पुरते हतबल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपने कंबर कसलेली असताना महायुतीच्या तटकरेंना मिळालेल्या मतदानापेक्षा दापोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साडे आठ हजारचे अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथील मतदारांनी महायुतीला याआधीच नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी संजय कदम यांच्यामागे प्रचंड ताकद उभी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

बुधवारी दापोली शहरात संजय कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ हा दापोली शहराची ग्रामदेवता श्री काळात त्यानंतर शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीफळ वाढविण्यात आले, यावेळी माजी आम. चंद्रकांत ऊर्फ भाई मोकल, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सुजाता तांबे, काँग्रेसचे तालूका अध्यक्ष अर्जुन शिगवण, राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष सचिन तोडणकर, शिवसेनेचे तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, नगराध्यक्षा ममता मोरे, शिवसेना दापोली शहर प्रमुख संदीप चव्हाण, एम. आर. शेटये, नगरसेवक विलास शिगवण, नगरसेविका नौशीन गिलगिले, रिया सावंत, अश्विनी लांजेकर, अप्पी मोरे, उमेश साटले, अॅड. डिमडिमकर, नरेंद्र करमरकर, रुचिता नलावडे, रमेश पांगत, नगरसेवक मेहबूब तळघरकर, अजिम चिपळूणकर, संतोष कळकुटके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरवासीयांना उस्फूर्त प्रतिसादाची दाद दिल्याने शहर वाढीस महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले.