छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलची आजपासून धूम

मुंबईकरांसह कलापेमींना भुरळ घालणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलची धूम आज गुरुवार, 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फेस्टिव्हलमध्ये कला, क्रीडा, संस्कृती आणि परंपरेची महापर्वणी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे पुढील चार दिवस कलेचा हा महोत्सव चालणार आहे.

‘वेध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणाऱया ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’चे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या फेस्टिव्हलमध्ये निष्ठावान वीर मराठा योध्यांची चित्रमय यशोगाथा सांगणारे ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे प्रदर्शन यंदाचे खास आकर्षण आहे. तसेच दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रs इतिहासप्रेमींसह विद्यार्थ्यांना बघण्याची संधी आहे. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाच्या मागील जागेत गेट क्र. 6 येथे हे प्रदर्शन असून दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत पाहता येणार आहे. मुंबईकरांनी या महोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक आणि शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे यांनी केले आहे.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

– ‘निर्मिती’ व्यासपीठाच्या माध्यमातून वनिता समाज हॉल येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
– गुरुवार, 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बिझनेस कनेक्टअंतर्गत उद्योजक चेतन रायकर आणि काwस्तुभ रायकर यांची मुलाखत घेण्यात येईल.
– 12 जानेवारीला सायंकाळी 6 वाजल्यापासून सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे.
– 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता भरतनाटय़मचा कार्यक्रम होईल.
– 14 जानेवारीला दुपारी 2 वाजता ‘उभ्या उभ्या’ हा सेलिब्रेटींचा स्टॅण्डअप कॉमेडी शो होणार आहे.

किड्स कार्निव्हलची धूम

पालक आणि चिमुकल्यांसाठी ‘किड्स कार्निव्हल’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. वनिता समाज हॉल येथे आयोजित चित्रकारांच्या कलाक्षितिज आर्ट गॅलरीत कलात्मक वस्तूंचा स्टॉल, लहानग्यांसाठी कला शिबीर यासोबतच निसर्गचित्रण, छायाचित्रण आणि चित्रकला स्पर्धेसह शिवाजी महाराज पार्क परिसरात तयार केलेले सेल्फी पॉइंटस, आर्ट इन्स्टोलेशनने हा परिसर गजबजणार आहे. ‘पाका&तील कट्टा’ म्हणजे शिवाजी पार्क रियुनियनच्या निमित्ताने अनेक मित्र समूह शिवाजी पार्क कट्टय़ावर गप्पागोष्टी करण्यास एकत्रित येतील.

खवय्यांसाठी खास मेजवानी

पालिका क्रीडा भवन मैदानात ‘मुंबई फूड फेस्ट’च्या निमित्ताने अस्सल खाद्य महोत्सवाची खास मेजवानी मिळणार आहे. याशिवाय उद्या गुरुवारी सायंकाळी 6 वाजता आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धा, 12 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ‘दादूस आला रे’, 13 जानेवारीला सायंकाळी 4 पासून ‘दादर गॉट टॅलेंट’ आणि सायंकाळी 6 वाजता ‘कोकण कलेक्टिव्ह बँड’चा परफॉर्मन्स होईल. 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ‘थ्री मॉन्क्स बँड’चे सादरीकरण होईल.