निलंग्यात पावसाने पिकांचे नुकसान; उपजिल्हाधिकाऱ्यांचे तत्काळ पंचनाम्याचे आदेश

निलंगा तालुक्यातील मोजे ननंद येथील उडीद, मूग व सोयाबीन पिकाची नुकसानीची पाहणी करण्यासाठी नणंद येथे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी भेट दिली असता नुकसान पाहून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.

निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील मागील आठ दिवसापासून संततधार पावसामुळे उडीद मूग सोयाबीन यांचे अतोनात नुकसान झाले असून यासंबंधी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी निलंगा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तलाठी, कृषी सहाय्यक यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उडीद व मूग या पिकाचे जवळपास 50 ते 60 टक्के नुकसान झालेले असून शासनाकडून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीची पाहणी करताना उपजिल्हाधिकारी झाडके सोबत तलाठी ननावरे, कृषी सहाय्यक लासूने, युवासेनेचे अण्णासाहेब मिरगाळे, शेतकरी सचिन मिरगाळे, हनुमंत देशमुख, प्रताप मेत्रे, रियाज मुल्ला, राहुल पेटकर, विशाल टोपना, अब्बास मुल्ला, आनंत देशमुख, माधव औंढे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.