Bhandara News : शहीद जवान नितीन खेडीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चीनच्या सीमेजवळ कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आलेले जवान नितीन खेडीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन हे टेंगा गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होते. चीन सीमेजवळ कर्तव्य बजावत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. खेडीकर यांचे पार्थिव मूळगावी आणलल्यानंतर प्रथम गावातील शाळेच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सर्व गावकरी, प्रतिष्ठीत व्यक्ती साश्रू नयनांनी खेडीकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी ‘नितीन खेडीकर अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम येथे नेण्यात आले. खेडीकर यांच्या 8 वर्षाच्या मुलाने पित्याला मुखाग्नी दिला.