हानीकारक कफ सिरप बनवणाऱ्या कंपन्यांना दणका

हिंदुस्थानी कफ सिरप कंपन्यांमुळे गाम्बिया, उजबेकिस्तान, कॅमेरून येथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर औषध निर्मिती करणाऱया कंपन्यांविरुद्ध सरकारने कडक पावले उचलली आहेत. आरोग्याला हानीकारक कफ सिरप बनवणारे युनिट बंद करण्यात आले आहेत. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) गेल्या वर्षभरात कफ सिरप बनवणाऱया 400 कंपन्यांची पाहणी केली. त्यातील 36 टक्क्यांहून अधिक युनिट बंद करण्याचे आदेश दिले.