हिंदुस्थानातील गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. एक्झमपेडीयाच्या रिपोर्टनुसार, 2023-24 या वर्षभरामध्ये हिंद्स्थानातून जवळपास 125 कोटी रुपये किंमतीचे शेण निर्यात करण्यात आले आहे. तसेच 173 कोटी रुपये किंमतीचे गायीच्या शेणापासून बनवलेले खत निर्यात करण्यात आले आहे. कंपोस्ट खत 88 कोटीचे निर्यात केले आहे. म्हणजेच एपंदरीत या सर्व गोष्टी एकत्रित केल्यास तब्बल 386 कोटी रुपये किंमतीचे शेण परदेशात निर्यात करण्यात आले आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हिंदुस्थानकडून शेण खरेदी करणायांमध्ये मालदीव पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अमेरिका, सिंगापूर, चीन, नेपाळ, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कुवेत, यूएईने शेण आयात केले आहे. हिंदुस्थानातील शेण हे विदेशातील शेतकऱयांसाठी सोन्याची खाण ठरत आहेत. त्यामुळे या शेणाला मोठी मागणी आहे.