वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, UPSC ची मोठी कारवाई

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरची उमेदवारीच यूपीएससीने रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने भविष्यात परीक्षा आणि निवडीतही पूजावर बंदी घातली आहे. यूपीसएससीने 2009 ते 2023 पर्यंतचे सर्व उमेदवारांचे रेकॉर्ड तपासले आहेत. या तपासणीत नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार पूजाला दोषी ठरवण्यात आले आहे.

यूपीएससीकडे पूजा खेडकरने सादर करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचीही पडताळणी करण्यात आली आहे. त्याशिवाय स्वतःसह आई-वडिलांची नावे बदलण्यात आली होती. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे म्हटले होते. या सर्व बाबी तपासल्यानंतर यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पूजा खेडकरच्या जामीन अर्जाबाबत दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता खेडकरच्या जामीन अर्जाबाबत निकाल देण्यात येईल. आजची कारवाई यूपीएससीच्या वतीने झालेली आहे.