आता बोलून काय उपयोग, मोहन भागवत आणि RSS चं कोण ऐकतंय? काँग्रेसचा भीमटोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) नेते इंद्रेश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. इंद्रेश कुमार यांना आता भाजपचा अहंकार दिसतोय. पण आरएसएससाठीच भाजप सर्वकाही करत आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

तुम्हाला भाजपचा अहंकार आज दिसतोय. पण आरएसएनेच हे भाजपचं बी पेरलेलं आहे. बाभळीचं बी पेरल्यावर आंबे कुठून येतील? मोहन भागवत मणिपूरवर कधी बोलले होते? आता ते बोलताहेत जेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचा काही संबंधच ठेवलेला नाही, अशी टीका काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केली.

अचानक RSS ने BJP वर हल्लाबोल का केला? खरं कारण आलं समोर!

हाथरसमध्ये पंतप्रधान मोदींचा पक्ष जे करत होता ते तुमच्या समोर होते. तेव्हा मोहन भागवत बोलले का? अजय मिश्रा टेनी यांच्यावर बोलले का? शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले का? अग्निवीर योजनेवर बोलले का? बिल्कीस बानो, अखलाकवर बोलले का? कन्हैयालाल टेलरची हत्या करणारे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, हे समोर आल्यावर मोहन भागवत त्यावर बोलले का? आता बोलल्याने काय उपयोग आहे. मग इंद्रेश कुमार बोलले काय किंवा मोहन भागवत बोलले काय. आता त्यांचं कोण ऐकतंय? असा टोला पवन खेडा यांनी लगावला.