कोणतेही मतभेद नाहीत, महाविकास आघाडी एकत्र पुढे जाणार आणि विजय मिळवणारच; बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी एकत्र पुढे जाणार असून आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीतील सर्व मुद्दे चर्चेने आणि समन्वयाने सोडवण्यात येत आहेत. कोणतेही मतभेद किंवा तिढा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्याला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेटून काही जागांच्या अदलाबदलीबाबत चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. काही मुद्द्यांवर प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची गरज असते. अशा मुद्द्यांचीही चर्चा करण्यात आली आहे, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीच्या एकत्र घेण्यात येणाऱ्या सभा काही कार्यक्रम, प्रचार याबाबतही प्रथामिक चर्चा झाली. सर्व गोष्टी समन्वयाने करणार आहोत. एकमेकांना मदत करत आम्हला पुढे जायचे आहे. आम्हाला महाविकास आघाडीच्या जास्तीतजास्त जागा निवडून आणत सरकार स्थापन करायचे आहे, तेच आपचे ध्येय आहे. आम्ही एकत्र असून महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आता प्रचार, राजकारणाची पातळी घसरली आहे. जयश्रीताई यांच्यावर अंतत्य खालच्या स्तरावर टीका करण्यात आली. आपल्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आमचे कार्यकर्ते संगमनेरमध्ये लक्ष ठेवत आहेत. एवढ्या खालच्या पातळीवर टीका झाल्यानंतर याप्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही. तसेच तक्रार घेण्यासाठीही टाळाटाळ करण्यात येत होती. बोलणारा आणि त्याच्याकडून वदवून घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. लाडली बहीण योजना आणतात आणि कारवाई करत नाही. सर्वांनी निषेध करावा असे सुजय विखे आणि समर्थकांचे वर्तन आहे. गलीच्छ वक्तव्य करणारा फरार आहे. तो वक्ता हे वक्तव्य करत असताना व्यासपीठावरील टाळ्या वाजवत होते. हे अंत्यत क्लेशकारक आहे. आता त्यांनी गलीच्छ भाषा वापरणाऱ्यांना लपवले असेल, तो फरार आहे, त्याला शोधून काढण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असेही थोरात म्हणाले.