भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा अमेठी मतदारसंघातून दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी इराणी यांचा 1,18 471 मताधिक्यांनी पराभव केला आहे. त्यामुळे सध्या भाजपची बहुरानीचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#WATCH | Uttar Pradesh | Congress candidate from Amethi, Kishori Lal Sharma leads against BJP leader Smriti Irani, he says, “This is the victory of the Gandhi family and the people of Amethi.” pic.twitter.com/Cfj7Kqs6tw
— ANI (@ANI) June 4, 2024
स्मृती इराणी या 2014 साली पहिल्यांदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढल्या होत्या. मात्र त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतरही त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले होते. 2019 ला स्मृती इराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यंदा राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने यंदा अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांना संधी देण्यात आली होती.