कोलकात्यात मिळतेय ‘कोल्ड ड्रिंक भुर्जी; रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियाच्या वापरातून नवनवीन व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. मात्र व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नसतो. याच अनुषंगाने अन्नाबाबतही विचित्र प्रयोग पाहायला मिळतात. कधी कुणी मॅगीपासून कुल्फी बनवताना दिसतो, तर कधी कुणी आईस्क्रीम पकोडे बनवण्याचा प्रयत्न करतो. अशाच एका अनोखा खाद्य प्रयोगाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कोलकात्यातील रस्त्यावरचा आहे. येथील एक अन्नविक्रेत्याने अंड्यासोबत नवीन प्रयोग केला आहे. सामान्यत: आपण मीठ, मसाला, कांदा, टोमॅटोचा वापर करून ऑमलेट किंवा अंड्याची भुर्जी बनवतो. मात्र या विक्रेत्याने कोल्ड ड्रिंकचा वापर करून अंडा भुर्जी बनवली आहे. यावेळी त्या विक्रेत्याने तेलाच्या ऐवजी फंटा या कोल्ड ड्रिंकचा वापर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विचित्र कॉम्बिनेशनचा आस्वाद घेण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्याच्या दुकानात रांग लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subrata Samaddar (@foodandstreett)

सदर व्हिडीओ हा @foodandstreett या अकांऊटवरून शेअर करण्ंयात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो आत्तापर्यंत 180 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओच्या कॅपशनमध्ये ‘ऑरेंज अंडा भुर्जी’ असे नाव देण्यात आले आहे. या विक्रेत्याने ही अनोखी भुर्जी एका पानावर सर्व्ह केली आहे. सोशल मीडियावर ही रेसिपी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.