दप्तर ठेवण्याच्या वादातून वर्गमित्राने केलेल्या दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मुलाच्या मानेला 12 टाके पडले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दौसा जिल्ह्यातील सिकराई उपविभागातील एका शाळेत ही धक्कादायक घटना घडली.
वर्गात बॅग ठेवण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये बुधवारी दुपारी भांडण झाले. मात्र शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केल्याने वाद तात्पुरता मिटला. त्यानंतर संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर वाद पुन्हा वाढला आणि आरोपी विद्यार्थ्याने पीडिताच्या मानेवर चाकूने वार केले.
दरम्यान, मुलगा जखमी अवस्थेत गावाबाहेरील नाल्यात आढळून आल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दौसा पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.