सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे शुक्रवारी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीआधी सर्वोच्च न्यायालयातील अनेक प्रलंबित महत्त्वपूर्ण खटल्यांचे निकाल देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यानुसार गेल्या वर्षी राखून ठेवलेल्या प्रकरणांसह विविध खटल्यांचा निकाल त्यांनी दिला. मात्र महाराष्ट्रातील गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होऊ शकला नाही. मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधी शिवसेनेची याचिका मागील सलग तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डावर सूचिबद्ध होऊनही तिन्ही दिवशी सुनावणी झाली नाही. अखेर गुरुवारी ही सुनावणी 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर गद्दार आमदारांच्या अपात्रतेची नवीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.