एआयची कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला संभाव्य ग्राहक कळणार

हल्ली प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला असून बांधकाम क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. आता केवळ ग्राहकाच्या आवाजावरून तो घरे खरेदी करण्यास इच्छुक आहे का, हे विकासकांना कळणार आहे. ‘द चॅटर्जी ग्रुप’ने महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘सिरस डॉट एआय’ या अॅपच्या माध्यमातून ही गोष्टी प्रत्यक्षात उतरवली आहे. याबाबत ‘सिरस डॉट एआय’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक बॅनर्जी म्हणाले, बांधकाम क्षेत्रात परिपूर्ण सेवा देण्याच्या हेतूने आम्ही हे पाऊल उचलले आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक शोधण्यापासून ते घर ग्राहकांच्या ताब्यात देण्यापर्यंतच्या गोष्टी सहजपणे शक्य होतील. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चौकशी करणाऱया ग्राहकांच्या केवळ आवाजावरून एआआय तंत्रज्ञान कोणता ग्राहक घर खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे, याबाबत आडाखे बांधू शकते. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाचा सेल्स विभाग पुढील नियोजन करू शकतो.