चीनमध्ये 623 किमीच्या वेगाने धावली ट्रेन

चीनची लेटेस्ट लेविटेटेड (मॅग्लेव्ह) ट्रेन एका चाचणी दरम्यान तब्बल 387 मैल प्रति तास म्हणजेच ताशी 623 किलोमीटर या वेगाने धावली. या ट्रेनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हा वेग पकडून सुपर कंडक्टिंग मॅग्लेव्हने एक नवीन उंची गाठली आहे. चीन जवळपास दोन दशकांपासून सर्वात वेगवान रेल्वे धावण्याचे नवीन विक्रम करत आहे. शांघाय शहराजवळील विमानतळ ते शहरापर्यंत एक छोटी मॅग्लेव्ह लाइन आहे. यावर ही चाचणी घेण्यात आली. भविष्यात ताशी 1 हजार किलोमीटर या वेगाने रेल्वे चालवण्याची चीनची योजना आहे.