चीन सीमेवर इंडो-तिबेट पोलिसांच्या 47 नव्या तुकडय़ा

ईशान्येकडील राज्यांना लागून असणाऱया चीन सीमेवरील सुरक्षा आणि गस्त वाढवण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 4 नवीन तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील 34 चौक्यांसह एकूण 47 नवीन चौक्यांवर या तुकडय़ा तैनात असतील. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटीबीपी दलात 7 नवीन तुकडय़ा आणि सीमा तळ तयार करण्यास मंजुरी दिली. यामुळे आयटीबीपी दलात 9,400 जवानांची भर पडलणार आहे. या 7पैकी 4 बटालियन तैनातीसाठी सज्ज आहेत. उर्वरित 3 बटालियन 2025 सालापर्यंत तयार होतील.