कर्नाटकात कन्नड शिका! मुख्यमंत्र्यांचा परप्रांतीयांना इशारा

कर्नाटकात कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा बोलली जाणार नाही  याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कानडी माणूस उदार आहे. त्याचाच गैरफायदा घेतला जात असून कानडी न बोलणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कानडी न बोलताही त्यांना कर्नाटकात राहता येत आहे असे वातावरण तयार झाले आहे. मात्र, तामीळनाडू, आंध्र आणि केरळमध्ये केवळ त्यांच्याच मातृभाषेचा वापर सगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. त्यामुळे कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाला कानडी आलीच पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील परप्रांतीयांना दिला आहे.

सिद्धरामय्या म्हणाले, आपल्या मातृभाषेचा प्रत्येक कानडी माणसाला अभिमान हवा, गर्व हवा. कानडी भाषेप्रति प्रेम विकसित झाले पाहिजे. कर्नाटकात फक्त आणि फक्त कानडी भाषेतून बोलू, अशी शपथ आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि तिची अंमलबजावणी केली पाहिजे.