न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायमूर्ती खन्ना यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार असून 25 मे 2025 रोजी ते निवृत्त होणार आहेत.
विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत. प्रथेप्रमाणे न्या. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. न्या. खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बनले. सध्या असलेल्या न्यायमूर्तींमध्ये न्या. खन्ना हे सर्वात ज्येष्ठ आहेत. 13 मे 2025 रोजी न्यायमूर्ती खन्ना हे निवृत्त होत असून सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.