दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करताना मतदारांची नावे हटवल्याच्या आरोपांची सावधपणे आणि योग्य ती चौकशी करा. त्याचबरोबर या प्रकरणात विविध राजकीय पक्षांचा सहभाग आहे का, हे तपासा असे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
2025 च्या मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणामध्ये मतदार याद्यांमधून मतदारांची नावे हटवल्याचा आरोप करत भाजपाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार देत पुरावेही सादर केले. याचाही संदर्भ निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टीने सादर केलेले पुरावेही त्यांना दिले आहेत.