ओ. सी. एस. इंडियाच्या कामगारांची पगारवाढ; कर्मचाऱयांनी मानले भारतीय कामगार सेनेचे आभार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये (मियाल) बॅगेज हँडलिंग, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक, कारपेंटर आणि मॅपॅनिक सर्व्हिस देणाऱया ओ. सी. एस. इंडिया लिमिटेडच्या कामगारांची भरघोस पगारवाढ झाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांचे मार्गदर्शन आणि संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्यामुळे हा पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. सदर करारावर मियाल व्यवस्थापनाकडून श्रीकांत पवार, राजेश म्हात्रे, ओ.सी.एस. व्यवस्थापनातर्फे बिक्रमसिंग भदौरिया यांनी सह्या केल्या. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, पोपट बेदरकर, सहचिटणीस मिलिंद तावडे, जगदीश निकम, विजय शिर्पे, निलेश ठाणगे, संजीव राऊत, बाबा शिर्पे आणि ओ.सी.एस. इंडिया लि. पंपनीमधील सर्व कमिटी सदस्य व कामगार यावेळी उपस्थित होते. ओ. सी. एस. इंडिया लिमिटेडच्या कामगारांचा एप्रिल 2023 ते मार्च 2026 या तीन वर्षांकरिता पगारवाढीचा करार करण्यात आला आहे. त्यात 1500 रुपयांपासून सहा हजार रुपयांपर्यंतची पगारवाढ होणार आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या मुळ पगारात 3500 हजारांची वाढ जानेवारीपासून झाली आहे. सध्याच्या वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या कामगारांमध्ये पगारवाढीच्या या करारामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.