छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार

 

छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमेवर अबुजमाडच्या जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले. दुपारी चारच्या सुमारास सुरक्षा जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली. सुरक्षा कर्मचाऱयांनी घटनास्थळावरून एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके-47 रायफलीसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला, असे पोलिसांनी सांगितले. बस्तर भागात या वर्षी आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या या चकमकीमुळे 157 वर पोहोचली आहे.