छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यात सोमवारी पिकअप वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 18 मजुरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले. या वाहनात 30हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व तेंदुपत्ता तोडण्याच्या कामासाठी गेले होते. परतताना हा अपघात झाला.
हा अपघात कबीरधाम जिल्ह्यातील पंडरिया तालुक्यात येणाऱ्या बाहपी या गावात हा अपघात झाला. हे सर्व मजूर सेमहारा गावाचे रहिवासी होते. हे सगळेजण तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते. त्या कामाहून परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात सुदूर वनांचल आणि डोंगराळ भागाचा आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी आपल्या सोशल मीडियावरून मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिल्याचं म्हटलं आहे.