छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने छगन भुजबळ यांना मुंबईतील बॉम्बे हस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ हे आज पुण्यात होते. पण अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत आणण्यात आले.

छगन भुजबळ यांना यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यावेळीही ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यावेळी व्हायरल इन्फेक्शनमुळे छगन भुजबळ यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.