हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चारधाम यात्रेवर आता गर्दीचं संकट घोंघावत आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ यांमुळे पर्यटकांचा ओघ गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. त्याचा पहिला आणि थेट परिणाम चारधाम यात्रेत दिसून आला आहे. कारण, अनेक पर्यटक चारधामांतील केदारनाथ आणि बद्रीनाथला गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.
त्यामुळे चारधाम यात्रेसाठी निघालेले अनेक श्रद्धाळू दर्शन न करताच परतीच्या मार्गाला लागले आहेत. वास्तविक या श्रद्धाळूंसाठी ऑनलाईन तत्वावर बुकिंगची सोय करण्यात येते. पण, बुकिंग न करणाऱ्यांनीही यंदा दर्शनासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले तरीही प्रचंड गर्दीमुळे सगळी सरकारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे ऋषिकेश या धामासाठी ऑनलाईन बुकिंग सध्या स्थगित करण्यात आलं आहे.
बुकिंग रद्द झाल्यामुळे सुमारे 4 हजार यात्रेकरू दर्शन न करताच परत गेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने बुकिंग बंद झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात बुकिंगची सोय करून देण्यात आली होती. त्यासाठी सुमारे 12 हजार यात्रेकरू वाट पाहत होते. मात्र आता ही सुविधाही बंद करण्यात आल्याने श्रद्धाळू परतीच्या मार्गाला लागले आहेत.