केवायसी नसल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार, वाहनांच्या फास्टॅगसाठी नव्या गाइडलाईन्स जारी

fastag-toll-plaza

टोलनाक्यावर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास वाहनावरील फास्टॅग यापुढे ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाणार आहे.

1 ऑगस्टपासून फास्टटॅगच्या नियमात बदल करण्यात आला आहे. देशभरात महामार्ग आणि राज्य मार्गावर टोल आकारला जातो. सरकारने वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक केले आहे. परंतु, आता टोल प्लाझावर कोणत्याही नियमांचे वाहनचालकांकडून उल्लंघन झाले तर त्या वाहनांचा फास्टटॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाणार आहे. फास्टटॅगसाठी केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. हिंदुस्थानी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या नियमानुसार, ज्या फास्टटॅग अकाऊंटला 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल तर त्यात बदल करणे गरजेचे आहे. फास्टॅग यूजरला अकाऊंटचा इन्शुरन्स तपासावा लागेल. फास्टटॅग अकाऊंटला जर 3 वर्षे झाली असेल तर केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. फास्टटॅग सेवेसाठी केवायसीची मुदत 31 ऑक्टोबर आहे.

काय करावे लागणार

सर्व यूजर्संना आपल्या केवायसीची माहिती 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अपडेट करावी लागणार आहे. यात वाहनाचा पह्टो आणि अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. तीन वर्षे जुने फास्टॅग असेल तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. यासाठी वाहनाचा पह्टो अपलोड करणे आवश्यक आहे. 5 वर्षे जुने फास्टॅग असेल तर हे बदलावे लागेल. नवीन
फास्टॅग घ्यावे लागेल.

जर वाहनचालकाने नवीन गाईडलाइन्सचे पालन केले नाही तर टोल प्लाझावर फास्टॅग काम करणार नाही. वाहनचालकांकडून दुप्पट टोल घेतला जाईल.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने फास्टॅगसाठी नवीन गाईडलाइन्स जारी केली. 1 ऑगस्ट 2024 पासून या गाईडलाइन्स अंतर्गत फास्टॅग यूजर्संना आपली केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे.