चंद्रपूरला पावसानं झोडपलं, 600 हून अधिक घरांची पडझड; दोघांचा मृत्यू, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. आजही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 600 हून अधिक घरांची पडझड झाली असून शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून नागभीड-नागपूर महामार्ग पुराच्या पाण्यामध्ये बंद पडला होता. तसेच … Continue reading चंद्रपूरला पावसानं झोडपलं, 600 हून अधिक घरांची पडझड; दोघांचा मृत्यू, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान