खरंतर ब्लॅकगोल्ड ही या शहराची ओळख. इथल्या भुगर्भात काळ्या सोन्याचा अगणित खजिना दडलायं. चंद्रपूरची हिच खरी ओळख. काळं सोनं म्हणजे कोळसा. कोळशानं चंद्रपूर शहराला नवी ओळख दिली. शहराच्या विस्तारही वाढविला. याच कोळशानं हजारो रिकाम्या हातांना रोजगार दिला. शहराचे औद्योगीकरण झालं अन अनेक कंपन्यांनी इथं बस्तान मांडलं. कंपन्यातून होणारं प्रदूषण आता टोकावर पोहोचले. वर्षातील 365 दिवसापैकी चंद्रपूरकरांसाठी केवळ 32 दिवसाचं आरोग्यासाठी चांगले असल्याचा अहवाल आला. या अहवालाने प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळ अपयशी झाल्याचे तर दिसतेच त्यासोबतच आरोग्यदायी जीवनाला ही पुरतं ओरबडलं आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज 24 तास घेण्यात येणार्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षणाचा 2023 वर्षातील प्रदूषणाची आकडेवारी चंद्रपूरसाठी धक्कादायक ठरली आहे. वर्षातील केवळ 32 दिवस आरोग्यासाठी चांगले ठरले आहेत. या आकडेवारी 365 दिवसात चंद्रपूर मध्ये केवळ 32 दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरले. 141 दिवस कमी प्रदूषणाचे. 151 दिवस जास्त प्रदूषणाचे. 36 दिवस आरोग्यासाठी हानिकारक तर 5 दिवस धोकादायक प्रदूषण होते, असे म्हटले आहे.
चंद्रपूर शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदले गेले नाही. ही तेवढी समाधानाची बाब .येथील प्रत्येक ऋतूला प्रदूषणाने कवेत घेतल आहे.पावळ्यातील 122 दिवसापैकी 95 दिवस प्रदूषित ठरले. हिवाळ्यातील 123 दिवसापैकी 122 दिवस प्रदूषित तर उन्हाळ्यातील 120 दिवसापैकी 116 दिवस प्रदूषित होते. या वाढत्या प्रदूषणावर खरंतर ठोस उपाययोजना व्हायला हव्यात. दुर्दैव असं की या गंभीर प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही.