Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज

Central Railway ने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, रेल्वेच्या अनियमिततेमुळे आणि गाड्या वेळेत धावत नसल्यामुळे प्रवाशांचा नेहमीच खोळंबा होतो. लांबच्या पल्ल्यावरून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच वेळा लेटमार्क सुद्धा लागतो. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक जाहीर केले असून ते 5 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार कळवा आणि मुंब्रा वासियांना रेल्वेन एकप्रकारे गुड न्यूज दिली आहे.

कळवा आणि मुंब्रा येथून मुंबईत कामानिमीत्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु जलद लोकलला या स्थानकांवर थांबा नसल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेने कळवा आणि मुंब्रा वासियांच्या अडचणी काही अंशी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता गर्दीच्या वेळी जलद गाड्या सुद्धा कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबणार आहेत. त्यानुसार सीएसएमटीच्या दिशेन जाणारी जलद गाडी सकाळी 8.56 वाजता कळवा स्थानकावर आणि सकाळी 9.23 वाजता मुंब्रा स्थानकावर थांबणार आहे. तसेच कर्जत-कसाराच्या दिशेने जाणारी जलद गाडी सायंकाळी 7.29 वाजता कळवा आणि सायंकाळी 7.47 वाजता मुंब्रा स्थानकावर थांबणार आहे.

मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल; रात्रीची कसारा, कर्जत लोकल 6 ते 12 मिनिटे आधीच सुटणार

त्याचबरोबर सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी सुटणारी कुर्ला-कल्याण साधी लोकल बंद करण्यात आली असून त्याजागी आता वातानुकूलित लोकल धावणार आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून कुर्ला-कल्याण वातानुकूलित लोकल सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी कुर्ला येथून सुटेल आणि 7.04 वाजता कल्याण स्थानकावर पोहचेल.