Chandrayaan 4 चांद्रयान योजनेला मंजुरी

चंद्राच्या अभ्यासासाठी नवी चांद्रयान मोहीम, शुक्र ग्रह कक्षेत अंतराळयान पाठवणे आणि हिंदुस्थानी अवकाश स्थानकासाठी गगनयान प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठीही आज केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. अधिक वजनाची सामुग्री अंतराळात घेऊन जाईल असा अत्याधुनिक प्रक्षेपक अग्नीबाण तयार करण्यालाही मंजुरी देण्यात आली. चांद्रयान-4 मोहिमेसाठी सरकारने 2,104 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या निर्णयामुळे आपण, 2035 पर्यंत स्वयंनिर्भर अवकाश स्थानकाची स्थापना आणि 2040 पर्यंत चंद्रावर हिंदुस्थानी अंतराळवीर उतरवण्याच्या लक्ष्यपूर्तीच्या जवळ आलो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे.