नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी

नगर जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करावे अशी मागणी होती. तसेच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशीही मागणी होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर नगरचे नामांतर झाले नव्हते. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाईल, अशी माहिती दिली होती.