सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत दिवाळी बोनस, भारतीय कामगार सेनेच्या बैठकीला यश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथील सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना यंदा घसघशीत दिवाळी बोनस मिळणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष–खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनासोबत दिवाळीच्या बोनससंदर्भात यशस्वीरीत्या बैठक पार पडली. यावेळी जास्तीत जास्त 48 हजार 700 रुपये आणि कमीत कमी 35 हजार रुपये दिवाळी बोनसची रक्कम निश्चित करण्यात आल्याचे भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी जाहीर केले.

बोनससोबतच 300 बेरोजगारांना पंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला असून जुन्या कामगारांमधील 46 कामगारांना बढती देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने सीओओ तौसिफ खान, ऑपरेशन्स हेड सौरभ दळवी, स्टेशन मॅनेजर रमेश राऊत, एच.आर. ऋतुराज हिरेखान आणि सिक्युरिटी हेड पवन शर्मा, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, सहचिटणीस जगदीश निकम, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, संजीव राऊत, नीलेश ठाणगे, युनिट अध्यक्ष सुजित कारेकर, उपाध्यक्ष नरेंद्र दळवी, सरचिटणीस सुदर्शन वारसे, खजिनदार संतोष लखमदे, युनिट सदस्य हेमंत नाईक, नितीन कदम, हरिश्चंद्र कराळे, सदस्य रवी शेलार, रमेश रसाळ, उमेश सुरती, अनिल गुरव उपस्थित होते.