सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर सीसीटीव्हीचा वॉच

परीक्षा शिस्तबद्ध आणि फसवणुकीशिवाय पार पडाव्यात यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना हे नियम लागू होतील.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात याव्यात असे बोर्डाने शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच सर्व शाळांना परीक्षा केंद्र बनवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. कोणत्याही शाळेत सीसीटीव्ही सुविधा नसल्यास त्या शाळेला परीक्षा केंद्र बनवण्याचा विचार केला जाणार नाही, असेही नोटिसीमध्ये म्हटले आहे. या वर्षी सुमारे 44 लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसतील.