मोठ्या ज्वेलर ब्रँडचा IPO येणार; कसा असेल लॉट, किती करावी लागेल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर…

गेल्या काही महिन्यात आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळे आयपीओमधीस गुतंवणूक वाढत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्रातील मोठ्या ज्वेलर ब्रँडचा आयोपीओ गुंतवणुकीसाठी मंगळवारपासून ( 10 सप्टेंबर) खुला होत आहे. याची अनेक गुंतवणूकदरांना प्रतिक्षा आहे.

महाराष्ट्रातील पीएन गाडगीळ ज्वेलर्स हा मोठा ब्रँड असून या सोन्या-चांदीचे दागिने घडवणाऱ्या कंपनीचा आयपीओ मंगळवारपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्स यातून 1100 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओचा प्राइस ब्रँड 456 रुपये ते 480 रुपये प्रति शेअर असा आहे. ग्रे मार्केटमध्ये याला चांगला प्रतिसाद दिसत आहे.

या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 31 शेअर्सचा एक लॉट म्हणजेच कमीत कमी 14,880 रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. आईपीओ गुंतवणुकीसाठी 10 सप्टेंबर 2024 खुला होणार आहे. तर यात 12 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तर 13 सप्टेंबरला शेअर्सची अलॉटमेंट करण्यात येणार आहे. तर आयपीओत शेअर न मिळालेल्यांना 16 सप्टेंबरला रिफंड मिळणार आहे. तर अलॉटमेंट झालेल्यांच्या डी मॅट खात्यात शेअर जमा होणार आहेत. तर एनएसई आणि बीएसईवर याचे लिस्टिंग मंगळवारी 12 सप्टेंबरला होणार आहे.

या कंपनीचे सध्या महाराष्ट्रात 33 तर अमेरिकेत एक स्टोअर आहे. यात 23 स्टोअर्स हे कंपनीचे तर 10 स्टोअर्स हे फ्रेंचायझीचे आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीचा नफा 23.7 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा 34.8 टक्के जास्त होता. त्यामुळे या आपीओला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.