बुर्ज खलिफा नंतर आता बुर्ज अजीजी

बुर्ज खलिफानंतर दुबईत आणखी एक उंच इमारत बनत आहे. या इमारतीचे नाव ‘बुर्ज अजीजी’ आहे. अजीजी म्हणजे प्रिय, अगदी जवळचा! रिअल इस्टेट पंपनी अजीजी डेव्हलपमेंट ही इमारत बनवत आहे. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर तर बुर्ज अजीजीची उंची 725 मीटर आहे. खरं तर ‘बुर्ज अजीजी’ इमारतीच्या कामाचा शुभारंभ यावर्षी जानेवारी महिन्यातच झाला. मात्र ही इमारत किती मीटर उंच असेल, याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. दुबईत कोणतीही उंच इमारत बनवण्यासाठी जनरल सिव्हील एव्हिएशन ऑथोरटीची मंजुरी घ्यावी लागते. अजीजी डेव्हलपमेंट पंपनी या मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.