मोदींच्या पीलभीतमधील सभेत वरुण, मनेका गैरहजर

भाजपाने उत्तर प्रदेशात अनेक जागांवर चर्चेत असलेल्या खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांचे तिकीट कापल्याने अनेकजण नाराज आहेत. वरुण गांधी त्यापैकीच एक आहेत. पीलभीतमध्ये झालेल्या रॅलीत वरुण आणि मनेका गांधी दोघेही गैरहजर दिसले. पीलभीत आणि आणि गाजियाबाद दोन्ही भाजपाचे बालेकील्ले राहीले आहेत. असे असले तरी पीलभीतमध्ये मोदींच्या सभेत अनेकांनी गैरहजेरी लावल्यामुळे नेत्यांमध्येच नाराजी असल्याचे दिसून आले. वरुण गांधी यांनी गेल्या वर्षात पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. शेतकरी आंदोलनासह विविध मुद्यांवर पक्षाच्या विरोधात विधाने केली होती. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे भाजपातील सुत्रांनी सांगितले. पीलभीत येथील सभेत मोदी पहिल्यांदाच सहभागी झाले. या सभेसाठी वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपा नेत्यांमध्येच चर्चा सुरु झाली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतही नाव नाही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांचे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही नाव नसल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या निर्णयात किंवा पक्षहीताच्या मुद्यावर जे नेते पक्षाच्या विरोधात बोलतात त्यांची पक्षाला गरज नसल्याचे पक्ष मानत असल्याचे भाजपमधील सुत्रांनी सांगितले आहे.