मुंबईत दिवसाढवळ्या एका अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील एका कॉफी शॉप बाहेर ही चोरीची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खार येथील टोकाई कॉफी स्टोअर स्टार बक्स येथे ही घटना घडली आहे. एमी एला रस्त्याने जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने एमी एलाची बॅग हिसकावली. एमीने दिलेल्या तक्रारीनुसार, खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमी एलान बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत ‘रन वे 34’ या सिनेमात काम केले आहे.
एमी एला ही हिंदुस्थानी तसेच ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजक आहे. तिच्या डान्समुळेही कायम चर्चेत असते. ती अहमदाबादमध्ये राहते. एमी एलाने अनेक बॉलीवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.