Lok Sabha Election 2024 : कंगनाचे डोके फिरले; म्हणे सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. कंगनाला भाजपने हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. नुकतीच तिची एक मुलाखत घेण्यात आली. यामध्ये तिने बोस यांच्याविषयीही वक्तव्य केले.

या मुलाखतीतला एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते, असे कंगना म्हणाली आहे. त्यावरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. तू राहुल गांधींना नावं ठेवतेस तर मग तू काय आहेस? असा प्रश्न तिला लोक ‘एक्स’वरून विचारत आहेत.

सुप्रीम जोकर पार्टीची जोकर

अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाचा हा व्हिडीओ शेअर करत सुप्रीम जोकर पार्टी की जोकर… किती हा अपमान आहे, अशी पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून कंगनाला प्रचंड ट्रोल केले आहे. या ज्ञानासह ही निवडणूक लढवायला चालली आहे, असे काही जणांनी म्हटले आहे, तर कंगना कुठल्या शाळेत शिकलीय, असा सवाल नेटकऱयांनी केला आहे.