धाराशीवमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मागील काही वर्षामध्ये सत्ता बदल करत भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले ही गोष्ट लोकांना रुचली नाही. धाराशीव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

शिवसेना नेते युवासेना प्रमुख. आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून खा ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येडशी येथील माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष उपसरपंच गजानन नलावडे ग्रा पं सदस्य मनोज गुरव, मिलिंद नलावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

इटकूर ता कळंब येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ, अजितसिंह प्रतापराव पाटील, रोहित आबासाहेब आडसुळ, ओम श्रीनीवास गंभीरे,उमेश दत्तात्रय आडसुळ,अजयसिंह विलासराव पाटील,सचिन सर्जेराव आडसुळ,खंडेराव हनुमंतराव गंभीरे,बळीराजे गंभीरे,जयदेव गंभिरे,नवनाथ आडसुळ,गोकुळ फरताडे आदी युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.