Sex Tapes Case: आरोपी प्रज्वल रेवन्ना उद्या हिंदुस्थानात येणार; सूत्रांची माहिती

सेक्स टेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्ना उद्या हिंदुस्थानात येणार पीटीआयने सूत्रांचा हवाल्यानं दिली माहिती.

निलंबित JD(S) नेता आणि कर्नाटकचा खासदार प्रज्वल रेवन्ना, सेक्स टेप प्रकरणातील आरोपी, 30 मे रोजी जर्मनीतील म्युनिक येथून बेंगळुरूला रवाना होईल, असं पीटीआयनं अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. रेवन्ना 31 मेच्या पहाटे बेंगळुरूमध्ये उतरण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) कर्मचारी केम्पेगौडा विमानतळावर लक्ष ठेवून आहेत आणि खासदाराला ते उतरताच अटक करतील.