शेतकऱ्याच्या जिवावर भाजप आमदारांनी मुंबईत 100 कोटी रुपयांची घरं घेतली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांच्या जिवावर भाजप आमदारांनी 100 कोटी रुपयांची घरं घेतली असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

एका सभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, 2014 साली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत होता. तो भावसुद्धा आता शेतकऱ्यांना मिळत नाहीये. ना शेतीला पाणी मिळालं, ना गोसेखु्र्द प्रकल्पात पाणी आलं, 10 वर्ष हा प्रकल्प तसाच आहे. भाजपचे काही नेते म्हणतात की मुंबईत आम्ही 100 कोटी रुपयांचं घर घेतलं. एकीकडे 10 वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी मुंबईत 100-100 कोटींची घरे घेतली. भाजपला मतदान करण्याची शिक्षा मिळाली शेतकऱ्यांना, मजा मारली भाजप आमदारांनी असेही वडेट्टीवार म्हणाले.