भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदार राजाला धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बस, जास्त आवाज करू नको, अशा शब्दांत प्रशांत बंब यांनी मतदाराला धमकी दिल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात महायुतीकडून प्रशांत बंब विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत आहे. वेरूळ येथे प्रचार सभा असताना प्रशांत बंब यांनी ही धमकी दिली. प्रशांत बंब यांना वेरूळ येथील ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. आमदार म्हणून 15 वर्षे काय केले ते आधी सांगा. मग मते मागा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशांत बंब यांचा पारा चढला. सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी शेतकऱयांचे प्रश्न, पशुवैद्यकीय दवाखाना, मका संशोधन पेंद्र, तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न यावर प्रश्न उपस्थित केल्याने बंब यांचा तीळपापड झाला.